“मरण अगोदरच ठरलेलं होतं” वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारलेली पण…; अवघ्या १० सेकंदातच खेळ संपला, व्हिडिओ व्हायरल!

जंगल म्हटलं की थरार, संघर्ष आणि जगण्यासाठीची धडपड असते. त्यातही, जंगलाचा राजा वाघ एकदा का शिकारीच्या मागे लागला, की त्यातून सुटका होणे जवळजवळ अशक्य असते. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण ‘मरण आधीच ठरलेलं असतं,’ अशी हळहळ व्यक्त करत आहेत.

नेमकं काय घडलं व्हिडिओमध्ये?

हा व्हिडीओ एका जंगल सफारीदरम्यान शूट करण्यात आला असावा, असे दिसते. एका हरणांचा कळप जंगलातून शांतपणे जात असताना, अचानक एका बाजूला झाडीत लपून बसलेला एक वाघ दिसतो. वाघाने संधी साधून कळपावर हल्ला केला. क्षणात सगळी हरणे जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागतात.

‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj
‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj

या धावपळीत, वाघाने एका हरणाला अचूक हेरले. अवघ्या १० सेकंदांमध्ये वाघाने हरणाच्या मानेवर हल्ला करून त्याला जमिनीवर पाडले. हरणाला सावरण्याची किंवा जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. वाघ त्याला फरफटत बाजूला घेऊन गेला आणि हरणाचा खेळ क्षणात संपला.

View this post on Instagram

A post shared by Girish R (@travel.kannadiga)

लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर travel.kannadiga नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो खूपच थरारक आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रbvzvतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने वाघाच्या अचूक ‘टायमिंग’चे कौतुक केले, तर दुसऱ्याने ‘मरण आधीच ठरलेलं असतं’ असे म्हणत हरणाबद्दल हळहळ व्यक्त केली.

हा व्हिडीओ जीवनातील कठोर वास्तवाचे दर्शन घडवतो. ‘जंगल का कानून’ म्हणजेच ‘शिकार करा किंवा शिकार बना’ हा नियम कायम राहणार, हेच यातून सिद्ध होते.

महागाई भत्त्यात मोठी वाढ; तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा Dearness Allowance Hike
महागाई भत्त्यात मोठी वाढ; तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा Dearness Allowance Hike

Leave a Comment