Namo Shetkari Yojana Hapta : राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य सरकारने या योजनेच्या वितरणासाठी ₹१,९३२.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Namo Shetkari Yojana Hapta
गेल्या काही दिवसांपासून ‘नमो योजना बंद झाली आहे,’ अशा अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शासनाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केल्यामुळे आता शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Namo Shetkari Yojana Installment
सातवा हप्ता कधी मिळणार?
सध्या मंजूर झालेला हा सातवा हप्ता एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीसाठी आहे. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांतून शेतकऱ्यांना मिळणारे वार्षिक ₹१२,००० रुपये त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करतात.
कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेच्या २०व्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. या निधीमधून पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त, ज्या शेतकऱ्यांची पीएफएमएस (PFMS) नोंदणी किंवा आधार लिंक करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
हा निधी पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत आणि गैरव्यवहार न होता पोहोचावा, याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.
यादी चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट : https://nsmny.mahait.org/