लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार, याकडे राज्यातील सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊनही ऑगस्टचा हप्ता जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबद्दल महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
हप्त्याबाबत मोठी अपडेट
सप्टेंबर महिना सुरू होऊनही ऑगस्टचे पैसे अजून जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबद्दल लवकरच माहिती दिली जाईल, अशी चर्चा सुरू होती. सप्टेंबरचे ५ दिवस उलटूनही पैसे जमा न झाल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, सध्या याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ऑगस्टचा हप्ता लवकरच येणार!
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी साम टीव्हीशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता लवकरच दिला जाईल. ही योजना अशीच यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे.”
यामुळे, ऑगस्टचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत घोषणेची वाट पाहावी.