राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राज्यात महिलांसाठी एक क्रांतीकारी पाऊल ठरली आहे. या योजनेने कोट्यवधी महिलांना थेट शासनाशी जोडले असून, अनेक महिलांनी यातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग छोटे उद्योग सुरू करण्यासाठी केला आहे. आता याच लाडक्या बहिणींना मुंबईतील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई बँक त्यांना शून्य टक्के व्याजदराने ₹१ लाख पर्यंतचे कर्ज देणार आहे.
Mumbai Bank Loan Apply
शून्य टक्के व्याजाचे गणित काय?
मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणारे पैसे उद्योग-व्यवसायांतून बाजारात यावेत, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. याला मूर्त स्वरूप देण्यासाठी मुंबई बँकेने एक खास योजना तयार केली आहे.
Mumbai Bank Loan interest
या योजनेत, महिलांना सुरुवातीला ९ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल. मात्र, राज्य सरकारच्या चार महामंडळांच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना हे व्याज परत दिले जाईल. ही चार महामंडळे खालीलप्रमाणे आहेत:
Mumbai Bank Loan types
- पर्यटन महामंडळाची ‘आई’ योजना
- अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ
- भटके विमुक्त महामंडळ
- ओबीसी महामंडळ
या महामंडळांच्या योजनांतून १२ टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा मिळतो. त्यामुळे, या योजनांसाठी पात्र असणाऱ्या महिलांना ९ टक्के व्याजदराने घेतलेल्या कर्जाचा परतावा मिळाल्यावर, त्यांचे कर्ज प्रभावीपणे शून्य टक्के दराने मिळेल, असे गणित दरेकर यांनी मांडले आहे.
Mumbai Bank Loan apply process
कसे मिळेल कर्ज?
प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, एखादी महिला मुंबई बँकेत अर्ज करून ₹१ लाख पर्यंतचे कर्ज घेऊ शकते. यासाठी व्यवसायाची तपासणी केली जाईल. तसेच, ५ ते १० महिला एकत्र येऊनही व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.
सध्या ही योजना मुंबईतील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. मुंबईत सुमारे १२ ते १३ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यापैकी १ लाखांच्या आसपास महिला बँकेचे सभासद आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, ज्यामुळे मुंबईतील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळेल.