Ladki Bahin Yojana August List : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरली आहे. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केले आहेत आणि आता त्यांच्या बँक खात्यात दरमहा ₹१,५०० जमा होणार आहेत. सरकारने योजनेच्या लाभार्थी यादीची घोषणा केली असून, तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासू शकता.
योजनेसाठी पात्रता निकष
- लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
- लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे अनिवार्य आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
या योजनेसाठी अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट फोटो आणि बँक पासबुकची प्रत यांसारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतील तुमचे नाव तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- स्टेप १: तुमच्या मोबाईलवर ‘नारी शक्ती दूत’ ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.
- स्टेप २: ॲप उघडल्यानंतर, विचारलेली सर्व माहिती भरा.
- स्टेप ३: मुख्य पानावर तुम्हाला ‘माझी लाडकी बहीण योजना’ असा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा.
- स्टेप ४: त्यानंतर तुम्हाला ‘लाभार्थी यादी पाहण्याचा’ पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही यादीत तुमचे नाव तपासू शकता.
जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. जर नाव नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.