खरीप पिकांचे नवीन हमीभाव जाहीर; 2025 चे हमीभाव कसे? किती? येथे पहा Kharip MSP List

Kharip MSP List 2025: केंद्र सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी १४ प्रमुख पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजेच हमीभाव जाहीर केला आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, काही प्रमुख पिकांच्या भावात लक्षणीय वाढ झालेली आहे.

‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj
‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj

प्रमुख पिकांच्या हमीभावात वाढ

  • सोयाबीन: सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल ₹४३६ ची वाढ झाली आहे. आता शेतकऱ्यांना ₹५,३२८ प्रति क्विंटलचा भाव मिळणार आहे.
  • कापूस: मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ₹५८९ ची वाढ करण्यात आलेली आहे.
    • मध्यम धागा: ₹७,७१० प्रति क्विंटल
    • लांब धागा: ₹८,११० प्रति क्विंटल
  • तूर: तुरीच्या हमीभावात ₹४५० ची वाढ झाली असून, आता तो ₹८,००० प्रति क्विंटल झाला आहेत.
  • मका: मक्याच्या हमीभावात ₹१७५ ची वाढ झाली असून, तो ₹२,४०० प्रति क्विंटलवर पोहोचला आहेत.
  • ज्वारी: ज्वारीच्या भावात प्रतिक्विंटल ₹३२८ ची वाढ झाली आहे.
    • हायब्रीड ज्वारी: ₹३,६९९ प्रति क्विंटल
    • मालदांडी ज्वारी: ₹३,७४९ प्रति क्विंटल

२०२५-२६ खरीप हंगामासाठी नवीन हमीभाव

पीक२०२४-२५ चा हमीभाव (₹)२०२५-२६ चा नवीन हमीभाव (₹)वाढ (₹)
कापूस (मध्यम धागा)७,१२१७,७१०५८९
कापूस (लांब धागा)७,५२१८,११०५८९
सोयाबीन४,८९२५,३२८४३६
तूर७,५५०८,०००४५०
मका२,२२५२,४००१७५
ज्वारी (हायब्रीड)३,३७१३,६९९३२८
ज्वारी (मालदांडी)३,४२१३,७४९३२८
भात (सामान्य)२,३००२,३६९६९
भात (ए ग्रेड)२,३२०२,३८९६९
बाजरी२,६२५२,७७५१५०
रागी४,२९०४,८८६५९६
मूग८,६८२८,७६८८६
उडीद७,४००७,८००४००
भुईमूग६,७८३७,२६३४८०
सूर्यफूल७,२८०७,७२१४४१
तीळ९,२६७९,८४६५७९
कारळे८,७१७९,५३७८२०

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या ५० टक्के हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List

महागाई भत्त्यात मोठी वाढ; तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा Dearness Allowance Hike
महागाई भत्त्यात मोठी वाढ; तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा Dearness Allowance Hike

Leave a Comment