या जिल्ह्यात 127 कोटींचा पिक विमा वाटप सुरू; येथे यादी चेक करा Crop Insurance Payment

Crop Insurance Payment: पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत बुलढाणा, अकोला, वर्धा, चंद्रपूर, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरीप २०२४-२५ हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी ₹१२७ कोटी ५० लाख इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील ८९ हजार ६२९ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

नुकसान भरपाईचा तपशील

जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित असल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तातडीने भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj
‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj
  • एकूण मंजूर भरपाई: जिल्ह्यासाठी एकूण ₹६२८ कोटी ८० लाख मंजूर झाले आहेत, ज्याचा फायदा ४ लाख ७६ हजार ३९२ शेतकऱ्यांना होणार आहे.
  • आधीच वाटप झालेली रक्कम: यापैकी ₹३३० कोटी ५४ लाख मदत २ लाख २८ हजार ६३६ शेतकऱ्यांना यापूर्वीच दिली गेली आहे.
  • सप्टेंबरमधील वाटप: सप्टेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात ₹१२७ कोटी ५० लाख रक्कम ८९ हजार ६२९ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

याव्यतिरिक्त, राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा सुरू असून, ती प्रकरणे मंजूर झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी भरपाई मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

तालुकानिहाय पीक विम्याची मदत

या टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
तालुकालाभार्थी शेतकरीमंजूर रक्कम (कोटींमध्ये)
चिखली२५,११०३७.१७
मेहकर२०,५८१२५.८८
सिंदखेड राजा९,५१०१७.३४
खामगाव३,९४२१०.२१
नांदुरा९,७०८८.७७
लोणार९,४१८७.२४
बुलडाणा३,६६८६.६५
मोताळा२,४९१४.०७
देऊळगाव राजा२,५२०२.८५
जळगाव जामोद१,०८८२.५५
शेगाव७५६२.२७
संग्रामपूर६१२१.९२
मलकापूर२२५०.५९

Leave a Comment