अतिवृष्टी नुकसान भरपाई ‘या’ 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार; यादी पहा Ativrushti Nuskan Bharpai List

Ativrushti Nuskan Bharpai List : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीत मोठं नुकसान झालं आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. सोयाबीन, मूग, उडीद, मका, कापूस आणि बाजरी यांसारख्या खरीप पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत, तर उभ्या पिकांची माती झाली आहे.

अतिवृष्टीचा हाहाकार आणि नुकसानीचा विस्तार

राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांमधील १९१ तालुके आणि ६५४ महसूल मंडळांमधील शेतीला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत १४.४४ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, तिथे ६,८०,५६६ हेक्टर क्षेत्रावर पिकांची हानी झाली आहे. याव्यतिरिक्त वाशिम, यवतमाळ, धाराशिव, बुलढाणा, अकोला आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj
‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj

या नुकसानीची पाहणी अजूनही सुरू असून, अंतिम आकडेवारी २० लाख हेक्टरच्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारच्या मदतीची आशा

या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. कृषीमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, पंचनामे लवकरच पूर्ण करून मदतीचा प्रस्ताव सादर केला जाईल. यानंतर, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात नुकसान भरपाई पडेल अशी आशा आहे.

लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List

या कठीण काळात शासनाने लवकरात लवकर पावले उचलून शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवणे आवश्यक आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी पुन्हा उभे राहण्यासाठी संजीवनी ठरेल, यात शंका नाही.

महागाई भत्त्यात मोठी वाढ; तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा Dearness Allowance Hike
महागाई भत्त्यात मोठी वाढ; तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा Dearness Allowance Hike

Leave a Comment