नमो शेतकरी योजनेचे 20000 रूपये बँक खात्यावर जमा; तुम्हाला मिळाले का? चेक करा Namo Shetkari Hapta status

Namo Shetkari Hapta status : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने यासाठी ₹१९३२.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, याचा लाभ ९२.३६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केल्यानुसार, ९ ते १० सप्टेंबर आज रोजी हा हप्ता जमा झालेला, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निधी वाटपाला सुरुवात झाली आहे.

‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj
‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj

तुमच्या खात्यात पैसे आले का? असे तपासा!

अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला आहे. तुम्हाला तुमचा हप्ता मिळाला आहे का, हे तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धती वापरा:

  • मोबाईल मेसेज तपासा: तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला मेसेज चेक करा.
  • बँकेचे स्टेटमेंट तपासा: तुमच्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन बँकिंगद्वारे तुमच्या खात्याचे स्टेटमेंट तपासू शकता.
  • बँक खात्यातील रक्कम तपासा: एटीएमवर जाऊन किंवा तुमच्या बँकेच्या ॲपवर लॉग इन करून तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासा.

जर तुम्हाला ‘पीएम किसान’ योजनेचा मागील हप्ता मिळाला असेल, तर हा हप्ताही तुम्हाला नक्कीच मिळेल. काही तांत्रिक अडचणींमुळे रक्कम जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो, पण तुमचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे.

लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List

Leave a Comment