माझी लाडकी बहीण योजने’चा जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर, आता महिला ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या योजनेतून सुमारे ४२ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही.
या महिला अपात्र का ठरल्या?
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही नियम आणि अटी ठरवल्या आहेत. ज्या महिला या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. अपात्र ठरण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- वयाची अट: योजनेचा लाभ फक्त २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मिळतो.
- कौटुंबिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त असल्यास.
- नोकरी आणि कर: कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास किंवा आयकर भरत असल्यास.
- वाहन: कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास.
या महिलांच्या अर्जांची पडताळणी अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी जाऊन करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा लाभ थांबवला जाईल.
तुमचे नाव यादीत आहे का?
तुम्ही ऑगस्ट महिन्याची नवीन यादी तपासू शकता. तुमचे नाव पात्र महिलांच्या यादीत आहे की नाही, हे पाहण्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट देऊ शकता.