महाराष्ट्राची लावणी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील तिच्या अनोख्या शैली आणि नृत्याने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होत असताना, आता गौतमी तिच्या स्टेजवरील डान्सव्यतिरिक्त एका खास व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर केलेला तिचा डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
स्विमिंग पूल व्हिडिओची चर्चा
गौतमीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती प्रसिद्ध ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर स्विमिंग पूलमध्ये थिरकताना दिसत आहे. तिच्या मनमोहक अदा आणि दिलखेचक सौंदर्याने तिने चाहत्यांना अक्षरशः घायाळ केले आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला असून, तिला ‘मराठीची बिपाशा बसू’ अशी उपमा दिली आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ आणखी चर्चेत आला आहे.
गौतमीचा यशस्वी प्रवास
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडासारख्या एका छोट्याशा गावातून आलेली गौतमी सुरुवातीला बॅकडान्सर म्हणून काम करत होती. मात्र, तिच्या मेहनत आणि जिद्दीने तिने स्वतःचे एक मोठे स्थान निर्माण केले. आज ती केवळ एक लोकप्रिय नृत्यांगणाच नाही, तर अभिनयाच्या क्षेत्रातही तिने पाऊल ठेवले आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेत तिने पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली होती आणि ‘शिट्टी वाजली रे’ या कुकिंग शोमधूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतमी पाटील एका डान्स शोसाठी ३ ते ५ लाख रुपये मानधन घेते, तर तिच्या टीमची महिन्याची कमाई सुमारे ४५ ते ५० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. हा आर्थिक यश तिच्या कठोर परिश्रमाचे आणि लोकप्रियतेचे प्रतीक आहे. गौतमी पाटील तिच्या कलेने आणि मेहनतीने मराठी मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.