LPG gas cylinder price : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळाला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. हा सिलिंडर आता ₹५१.५० ने स्वस्त झाला असून, आजपासून (१ सप्टेंबर) नवीन दर लागू झाले आहेत.
प्रमुख शहरांमधील नवीन दर
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झालेल्या या कपातीचा थेट फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिकांना होणार आहे. प्रमुख शहरांमधील नवीन दर खालीलप्रमाणे आहेत:
- दिल्ली: ₹१,५८०
- मुंबई: ₹१,५३१.५०
गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅसच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. याआधी ऑगस्टमध्ये ₹३३.५० ची कपात झाली होती, तर जुलैमध्येही किंमत ₹५८ ने कमी झाली होती.
घरगुती गॅसचे दर स्थिर
व्यावसायिक गॅसच्या दरात घट होत असली तरी, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या चार-पाच महिन्यांपासून घरगुती सिलिंडरचे दर स्थिर आहेत. सध्या घरगुती सिलिंडरचे दर खालीलप्रमाणे आहेत:
- मुंबई: ₹८५२.५०
- दिल्ली: ₹८५३
- कोलकाता: ₹८७९
- चेन्नई: ₹८६८
या किमतींमधील कपातीमुळे व्यावसायिक ग्राहकांना त्यांच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.